google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
ताज्या घडामोडी

७९ प्रगतिशील शेतकरी कृषिरत्न पुरस्काराने सन्मानित…

जनसेवा सप्ताहातील सर्वात ग्रेट कार्यक्रम...आ.राजू नवघरे

वसमत

शरीफ आलम

महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे ७९ प्रगतशील शेतकऱ्यांना आमदार राजू नवघरे यांच्या हस्ते कृषीरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी पूरजळ येथील शेतकरी नामदेव वाणी यांचा सुद्धा कृषिरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला.रविवारी २ ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजू नवघरे होते.तर व्यासपीठावर जिल्हा उपनिबंधक यांचे प्रतिनिधी बालाजी पठाडे.शास्त्रज्ञआनंद गोरे.राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब गायकवाड माजी सभापती अंकुश आहेर. बाळूमामा ढोरे.तालुकाध्यक्ष संजय दराडे.युवक जिल्हाध्यक्ष आदित्य आहेर आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना आमदार राजू नवघरे म्हणाले की आम्ही २२ जुलैपासून महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताहाच्या माध्यमातून महाआरोग्य शिबिर.महा रक्तदान शिबिर.स्वच्छता अभियान.महिलांना शिलाई मशीनचे वाटप.वृक्षारोपण कार्यक्रम.महिलांच्या सन्मान कार्यक्रम आदी विविध सामाजिक उपक्रम राबविले मात्र कोवीड च्या काळात जेव्हा देशाची जीडीपी पडली होती ती जीडीपी वाचविण्याचे काम याच शेतकऱ्यांनी केले.त्यामुळे जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती विनोद अंभोरे यांनी या शेतकरयांना कृषिरत्न पुरस्कार देऊन सन्मानीत करण्याचा जो कार्यक्रम ठेवला हा जनसेवा सप्ताहातील सर्वात ग्रेट कार्यक्रम असल्याचे आमदार राजू नवघरे यांनी सांगून सभापती विनोद अंभोरे यांचे कौतुक केले.पुढच्या काळात जवळाबाजार परिसरातील ७० गावांच्या प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन बसस्थानक जवळाबाजार येथे उभारणीचा मानस त्यांनी व्यक्त केला.येत्या काही दिवसातच सिद्धेश्वर उपसा जलसिंचन योजना कारन्यान्वित करून शिरडशहापूर.अंबाचोडी. पुरजळ सर्कलच्या शेतकऱ्यांना उन्हाळ्यात मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार नवघरे यांनी केले.यावेळी पूरजळ येथील शेतकरी नामदेव वाणी यांचा सुद्धा कृषिरत्न पुरस्कार देऊन आमदार राजू नवघरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.यावेळी सभापती विनोद अंभोरे.संचालक माऊली ढोबळे.गणेश डुकरे.गणेश हरके.नारायण चोपडे.नामदेव पारटकर.विनोद हरके. निळकंठ नेव्हल.आदींची उपस्थित होती.यावेळी जवळ बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती विनोद अंभोरे यांनी यावर्षीच्या हंगामात जे शेतकरी हळदीचे विक्रमी उत्पादन घेतील त्या शेतकऱ्याला १ लाख ५१ हजार रुपयाचे रोख बक्षीस येण्याचे जाहीर केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रमेश मानवते यांनी केले.कार्यक्रम यशस्वीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उपसभापती संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने शेतकरी व्यापारी उपस्थित होते.

Share
Back to top button