google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
ताज्या घडामोडी

वसमत उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सुविधा उपलब्ध

शरीफ आलम

वसमत उपजिल्हा रुग्णालयात अखेर डायलिसिस मशीन दाखल झाल्याने वसमत तालुक्यासह परिसरातील डायलिसिस रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता डायलिसिससाठी रुग्णांना बाहेरगावी जाण्याची गरज भासणार नसून सर्व आवश्यक सुविधा वसमत येथेच उपलब्ध होणार आहेत. आमदार राजु भैया नवघरे यांनी सदरील प्रस्ताव मंजूर करून घेतला होता .या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
ही सुविधा उपलब्ध होण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, उपविभागीय अधिकारी विकास माने, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गंगाधर काळे, तसेच पत्रकार मोईन कादरी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. व वसमत तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचे मोलाचे सहकार्य केला. त्यांच्या या सर्वांच्या प्रयत्नांबद्दल रुग्णांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
डायलिसिस मशीनच्या फिटिंगचे काम डॉ. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली युद्धपातळीवर सुरू असून, लवकरच डायलिसिस युनिट रुग्णांच्या सेवेत सुरू होणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

Share
Back to top button