फुलसिंग नाईक शाळेत प्रजासत्ताक दिन व स्नेह संमेलन उत्साहात साजरा
शरीफ आलम
वसमत शहरातील फुलसिंग नाईक उर्दू/मराठी उच्च प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन व वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .शहरातील फुलसिंग नाईक उर्दू मराठी उच्च प्राथमिक शाळेत 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी अध्यक्ष अमजद खान ऊर्फ नम्मू भाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच विघार्थ्यानी शहरातील मुख्य रस्त्यावरुन प्रभात फेरी काढली. प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसिलदार शारदा दळवी, नगराध्यक्षा प्रतिनिधी कन्हैया मनमोहन बाहेती, उपनगराध्यक्ष सय्यद इमरान अली,माजी उपाध्यक्ष खैसर अहमद, नगर सेवक गटनेता सचीन दगडू, नगरसेविका डॉ रेणूका पतंगे, नगरसेवक शेख हबीब शेख बशीर,नगरसेवक शेख हारुण दालवाले, नगरसेवक आयफान चाऊस, सेवानिवृत्त नायब तहसीलदार शेख करिमोददीन माजी नगरसेवक अँड.शेख मोहसीन, अफरोज कादरी,महमद साजीद जिलानी,पत्रकार चंद्रकांत देवणे, पत्रकार संजय बर्दापूरे,संपादक फेरोज पठाण, पत्रकार शरीफ आलम,नासर पठाण,कलीम पठाण, सय्यद जमीर सर , सय्यद अबरार सर, युनुस पठाण,उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर गीतं सादर करून उपस्थितीतांचे मनोरंजन केले. संस्था अध्यक्ष अमजद खान ऊर्फ नम्मू भाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक कैलास राठोड व शिक्षक,शिक्षिकानी परिश्रम घेतले. यावेळी कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचलन इसहाक पठाण सर यांनी केले..
