google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
ताज्या घडामोडी

हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांची भव्य तिरंगा रॅली 🔺🔺▶️🔺🔺🔺

संपादक -इसाक पठाण

वसमत :

वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या मार्गदर्शनाखाली हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांची भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली यावेळी उपविभागीय अधिकारी विकास माने,नायब तहसीलदार डोणगावकर, गटशिक्षणाधिकारी काष्टे यांच्यासह शहरातील शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

दिनांक 14 आगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली या रॅलीची सुरुवात उपविभागीय अधिकारी कार्यालयापासून करण्यात आली ही रॅली जिल्हा परिषद, पोलीस स्टेशन,गवळी मारुती मंदिर या शहराच्या मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत पंचायत समिती कार्यालय मैदानात सांगता झाली.शालेय विद्यार्थ्यांचा तिरंगा रॅलीत अहिल्यादेवी कन्या विद्यालय, ब.स्मारक विद्यालय, जिल्हा परिषद शाळा, सहभागी होत्या त्यावेळी उपविभागीय अधिकारी विकास माने , नायब तहसीलदार डोणगांवकर , पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी काष्टे यांनी हातामध्ये तिरंगा झेंडा घेऊन रॅलीला सुरुवात केली त्यावेळी ब.स्मा. शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण शेळके सर, कदम सर, मुळे सर, दांडेगावकर सर, व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते ही तिरंगा रॅली शहराच्या मुख्य मार्गाने काढून पंचायत समिती कार्यालय येथे रॅलीची सांगता करण्यात आली व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

Share
Back to top button