ताज्या घडामोडी
शेख हकीम शेख समद यांची पोलिस उपनिरीक्षक पदी पदोन्नती

वसमत (इसाक पठाण)
वसमत येथील रहिवासी तथा हट्टा पोलीस ठाण्यात कार्यरत शेख हकीम शेख समद यांची पोलिस उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाली आहे
शेख हकीम शेख समद हे हिंगोली जिल्ह्यातील हट्टा पोलीस ठाण्यात सहायक पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे नुकतीच त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाली आहे त्या निमित्ताने हट्टा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव तसेच पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
शेख हकीम शेख समद यांनी बाळापूर,कुरुंदा,वसमत इत्यादी ठिकाणी उत्कृष्ट सेवा बजावली आहे.
यावेळी प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की मला पोलीस उपनिरीक्षक पदी मिळालेली पदोन्नती हे माझ्या आई वडिलांचे आशीर्वाद तसेच पोलीस दलात सतत इमानदारीने केलेल्या मेहनतीचे फळ आहे.

