google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
ताज्या घडामोडी

परभणी -हिगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी महायुतीत रस्सीखेच संख्या बळाच्या आधारे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट प्रमुख दावेदार

वसमत (इसाक पठाण)

परभणी – हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ निवडणुकीची घोषणा होताच महायुती मध्ये या जागेवरून रस्सीखेच सुरू झाली असून महायुतीत सर्वात जास्त मतदार हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे असल्याने यावर या पक्षाने दावा केला आहे

महायुतीत रस्सीखेच:

परभणी – हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाची (विधान परिषद सदस्य) निवडणूक जाहीर झाली आहे.याच बरोबर महायुतीत या जागे वरून प्रचंड चुरस निर्माण झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे गटात रस्सीखेच पहायला मिळत आहे.

:- सर्वाधिक संख्या बळाच्या आधारे राष्ट्रवादीचा दावा –

:या मतदारसंघात एकूण 465 मतदार आहेत त्यापैकी सर्वाधिक 131 सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे आहे.भारतीय जनता पक्षाकडे शंभरच्या जवळपास तर शिवसेना शिंदे गट तिसऱ्या स्थानी आहेत . संख्या बळाच्या आधारे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटच प्रबळ दावेदार मानला जात आहे.त्यामुळेच संख्या बळाच्या आधारे नैसर्गिक दुष्टीया ही जागा राष्ट्रवादीला मिळाली पाहिजे अशी आग्रही मागणी वसमतचे आमदार राजू भैय्या नवघरे तसेच पाथरीचे आमदार राजेश विटेकर यांनी पक्षाकडे व महायुतीकडे केली आहे.वसमतचे आमदार राजू भैय्या नवघरे यांनी महायुतीत जागा राष्ट्रवादीला दिली तर खमक्या उमेदवार देणार असल्याचे सांगितले आहे

विद्यमान विधान परिषद सदस्य शिवसेनेचा”

परंतु मागच्या निवडणुकीत परभणी -हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून एकत्रित शिवसेनेचे विप्लव बाजोरिया यांनी काँग्रेस -एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश देशमुख यांचा पराभव करून विधान परिषदेत प्रवेश केला होता.शिवसेना फुटीनंतर बाजोरिया हे शिवसेना शिंदे गटात गेले शिवसेना शिंदे गट सध्या महायुतीत आहे त्या अनुषंगाने या जागेवर शिवसेना शिंदे गटाने आपला दावा सांगितला आहे.शिंदे गटाकडून विद्यमान विधान परिषद सदस्य विप्लव बाजोरिया व शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष सईद खान प्रमुख दावेदार आहेत.

:-भाजप शतप्रतिशत भाजपच्या तयारीत:-

महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटापाठोपाठ भारतीय जनता पार्टीचे सदस्य आहेत.भाजप पक्षाने आता पासूनच शतप्रतिशत भाजपाच्या भूमिकेतून वाटचाल सुरू केल्यास ही जागा भाजपा लढू शकते त्यांच्या कडून वरपुडकर व बोर्डीकर ही बलाढ्य नांवे चर्चेत आहे.

महाविकास आघाडीत शांतता

महायुतीत रस्सीखेच सुरू असताना आघाडीकडे संख्या बळ नसल्याने शांत वातावरण दिसत आहे .महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना उध्दव ठाकरे गट या पक्षाचे सदस्य आहेत. परभणीचे आमदार डॉ राहुल पाटील,माजी विधान परिषद सदस्य बाबा जानी दुर्रानी , माजी विधान परिषद सदस्य सुरेश देशमुख आदी मातब्बर नेते महाविकास आघाडीचा आर्थिकदृष्ट्या तुल्यबळ उमेदवार कोण असावा याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे

मतदाराना बलाढ्य उमेदवार हवा

तर तिसरीकडे अर्थपूर्ण बलाढ्य उमेदवाराच्या प्रतिक्षेत मतदार असल्याची ही चर्चा जोरात सुरू आहे.

Share
Back to top button