राज्यस्तरीय बुद्धिबळ निवड चाचणीसाठी जिल्हा स्तरीय निवड चाचणी संपन्न राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी संघ रवाना होणार

वसमत (इसाक पठाण)
विविध वयोगटातील बुद्धिबळ स्पर्धा साठी हिंगोली जिल्हास्तरीय बुद्धिबळ निवड चाचणी* *2026*स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यात राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मुला मुलींची निवड करण्यात आली
विविध वयोगटातील मुले मुली साठी राज्यस्तरीय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे
यात ७ वर्षाखालील मुले व मुली30/ 31मे पुणे येथे ०९ वर्षाखालील मुले व मुली ०२/०२ जुन छत्रपती संभाजीनगर ११ वर्षाखालील मुले व मुली १३ वर्षाखालील मुले व मुली ०५ व ०७ जून रोजी सोलापूर येथे विविध गटाच्या स्पर्धा होणार आहेत तरी यात सहभागी होण्यासाठी हिंगोली जिल्ह्याचा संघ निवड चाचणी घेऊन हिंगोली जिल्ह्याचा संघ तयार करण्यात आला दिनांक 24 मे 2026 रविवार रोजी तालुका क्रीडा संकुल हिंगोली येथे निवड चाचणी घेण्यात आली निवड चाचणीला प्रमुख उपस्थिती प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर व बुद्धिबळ संघटनेचे जिल्हा सचिव एम ए बारी उपस्थित होते व तसेच निवड चाचणी आयोजन शेख रहीम व प्रकाश अडकिने वसमत तसेच हिंगोली येथील बेले व बजरंग कदम यांनी सहकार्य केले व निवड चाचणीला पालक सुद्धा उपस्थित होते निवड चाचणीमध्ये जिल्ह्याचा संघ खालील प्रमाणे निवड करण्यात आली७ वर्षाखालील मुली:- १)जुनेरा फातिमा शेख मोहसीन मुले :-९) वर्षा खालील मुले १) संभाजी शेळके२) हर्ष साबळे मुली:-१) संस्कृती सोळंके२) ११ वर्षाखालील वयोगट मुले:-१) कार्तिक कैलास बेले मुली:-१) देवांशी नामदेव चापके २) श्रद्धा शिवाजी साबळे तेरा वर्षे वयोगट मुले:-१) जय नामदेव पवार २)वेदांत विनोद कुंदर्गे ३)कुणाल शेळके ४)वेद रोहित देशपांडे ५)अहमद शेख मोहसीन ६)शिवराज सोळंके निवड करण्यात आली. खेळाडूंना प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर व जिल्हा सचिव एम.ए बारी यांनी खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी बॉक्सिंग संघटनेचे जिल्हा सचिव फिरोज पठाण व एकता फाउंडेशन चे संचालक गजानन आडे यांनी विजयच्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

