जंतर-मंतरवरील लाठीचार्जचा वसमत वकील संघातर्फे तीव्र निषेध..

वसमत
शरीफ आलम
नवी दिल्ली जंतर मंतर येथे विद्यार्थावर पोलिसांकडून झालेल्या अमानुष लाठीचार्ज हल्ल्याचा वसमत वकील संघातर्फे राष्ट्रपतींना पाठविण्यात आलेल्या निवेदना तीव्र निषेध करण्यात आला आहे.शुक्रवारी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत महामहीम राष्ट्रपतीना पाठविण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की नवी दिल्ली येथे नीट पेपर फुटी प्रकरणी शांतिप्रिय मार्गाने विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असताना पोलिसांनी विद्यार्थ्यांवर अमानुष लाठी चार्ज केला.यात कित्येक विद्यार्थी गंभीररीत्या जखमी झाले आहे. विद्यार्थ्यावर अमानुष लाठी चार्ज करणाऱ्या या यंत्रणे विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी वकील संघाने निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी ज्येष्ठ वकील एड. रणधीर तेलगोटे.एड.अरुण आंबेकर.एड.योगेश अग्रवाल. एड.सि ऐ देशमुख.एड फैसल आलम.एड.मोसिन शेख एड. नाहीद सिद्दिकी.एड.कामरान एड मुरूमबेकर.एड सोहेल सिद्दीकी.एड.मोईज आदी उपस्थित होते.

