google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
ताज्या घडामोडी

लोकप्रिय आमदार राजू भैय्या नवघरे यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक 8 मध्ये जनसेवा सप्ताह अंतर्गत स्वच्छता अभियान व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न ▶️▶️▶️▶️▶️▶️▶️ युवा व कर्तव्यदक्ष नगरसेवक शेख मोहम्मद कामरान यांचा पुढाकार ▶️▶️▶️▶️▶️▶️▶️

संपादक:- इसाक पठाण

वसमत

स्व. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आमदार राजू भैय्या नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली वसमत शहरात जनसेवा सप्ताह विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. त्याअंतर्गत गुरुवार, २३ जुलै रोजी प्रभाग क्रमांक ८ मधील नालंदा नगर येथे स्वच्छ भारत अभियान व वृक्षारोपण मोहीम उत्साहात राबविण्यात आली.

स्वच्छ, सुंदर आणि हरित भारताच्या संकल्पनेला बळ देण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमात परिसर स्वच्छता, कचरा निर्मूलन तसेच पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण करण्यात आले. नागरिकांनीही या अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.

यावेळी आमदार राजू भैय्या नवघरे, युवा व कर्तव्यदक्ष नगरसेवक शेख मोहम्मद कामरान, नगरसेविका स्नेहा मनोहरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आनंद बडवणे ,नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

तसेच उपनगराध्यक्ष सय्यद इमरान नासेर अली, लक्ष्मीकांत नवघरे, राजूभैय्या सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळूमामा ढोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे वसमत शहराध्यक्ष आनंद बडवणे, नगरसेवक प्रतिनिधी शेख युनूस (पॉप्युलर), नगरसेवक प्रतिनिधी हारून दालवाले, मुबीन जमीनदार यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी “स्वच्छता हीच खरी सेवा आणि वृक्षारोपण हीच भावी पिढीची सुरक्षा” हा संदेश देत प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संवर्धनासाठी किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. स्वच्छ आणि हरित भारत घडविण्यासाठी अशा लोकसहभागातून राबविण्यात येणारे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

उल्लेखनीय म्हणजे युवा नगरसेवक शेख मोहम्मद कामरान व शेख महमद युनूस पापुलर या पिता पुत्रानी प्रभागात एसआयआर संदर्भात मतदारांत जनजागृती करुन गणना प्रपत्र भरून देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन केले होते.

Share
Back to top button