ताज्या घडामोडी
वसमतचे नूतन तहसीलदार सारंग चव्हाण यांचा सत्कार

संपादक:- इसाक पठाण
वसमत:-
वसमतच्या तहसीलदार पदी रुजू झालेले सारंग चव्हाण यांचा सत्कार अमजद खान उर्फ नम्मू मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आला.
वसमतच्या तहसीलदार पदी कर्तव्यदक्ष सारंग चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे या निमित्ताने अमजद खान उर्फ नम्मू मित्र मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अमजद खान उर्फ नम्मू मित्र मंडळाचे अध्यक्ष तथा फुलसिंग नाईक शाळेचे अध्यक्ष अमजद खान उर्फ नम्मू तसेच फुलसिंग नाईक शाळेचे मुख्याध्यापक कैलास राठोड यांच्या हस्ते तहसीलदार सारंग चव्हाण यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी शाळेचे संचालक शेख साजीद जिलानी, चव्हाण ,आदी उपस्थित होते .

