google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
ताज्या घडामोडी

वसमत येथील महाआरोग्य शिबिरात साडेचारशे रुग्णांची आरोग्य तपासणी..

वसमत

शरीफ आलम

महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त वसमतचे आमदार राजू नवघरे यांच्या संकल्पनेतून आयोजित महाआरोग्यशिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या शिबीरात साडेचारशे रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.यावेळी गरजू रुग्णांची मोफत रक्त तपासणी करण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त वसमत विधानसभा मतदारसंघात जनसेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.या सप्ताहा मध्ये आमदार राजू नवघरे यांच्या संकल्पनेतून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहे.याच उपक्रमामध्ये आज गुरुवारी शहरातील शुक्रवार पेठ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महाआरोग्य शिबिर घेण्यात आले या शिबिराचे उद्घाटन आमदार राजू नवघरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ गंगाधर काळे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदीप काळे. पब्लिक हेल्थ मॅनेजर डॉ ज्ञानेश्वर पवार.उपनगराध्यक्ष सय्यद इमरान अली. नगरसेवक आयफान चाऊस नगरसेवक हारुण दालवाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष अमजद खान.वसंत चेपुरवार शिवराज कदम जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य मोबीन जमीनदार.अल्पसंख्याक शहर अध्यक्ष माजीद इनामदार. आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ शारेख अहमद. डॉ सौरभ मसारे. डॉ शंकर राऊत.डॉ.सीमा काळे डॉ शहनाज परवीण.डॉ देवयानी देशमुख.डॉ अमरीन जुनेद पाशा.डॉ सचिन वाष्यटर.डॉ विखार हुसेन.डॉ अंजली चापके डॉ श्याम बोखारे. डॉ साईप्रसाद शिंदे.डॉ प्रतीक मोकळे आदी डॉक्टरांनी सुमारे साडेचारशे रुग्णांची रुग्ण तपासणी करून निदान केले.यावेळी आवश्यक रुग्णांची मोफत रक्त तपासणी करण्यात आली असून मोफत औषध वितरित करण्यात आले आहे.ज्या रुग्णांना निदानामध्ये शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास त्यांची उपजिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात येणार आहे.या महाआरोग्य शिबीराला उदंड प्रतिसाद मिळाला असून रविवारी २६ जुलै सिद्धेश्वर शाळा पाटील नगर येथे सुद्धा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यावेळी वसमत व परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आव्हान आमदार राजू नवघरे यांनी केले आहे.

Share
Back to top button