google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
ताज्या घडामोडी

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आमदार राजू नवघरे यांचा दणदणीत विजय.

वसमत

शरीफ आलम

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आमदार राजु नवघरे यांनी प्राथमिक कृषी पतपुरवठा वि.का.से.स. संस्था. मतदारसंघातील एकूण ७९ मतान पैकी ५८ मते मिळवित दणदणीत विजय मिळविला. त्यांच्या प्रतिस्पर्धी तुषार जाधव यांना २० मतावरच समाधान मानावे लागले.तर एक मत बाद झाले.परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी रविवारी वसमत येथील शासकीय विश्रामगृह येथे मतदान प्रक्रिया पार पडली होती.या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला.त्यात प्राथमिक कृषी पतपुरवठा वि. का.से.स.संस्था मतदारसंघातून निवडणूक लढवीत असलेल्या वसमत विधानसभेचे आमदार राजू नवघरे यांनी एकूण ७९ मतदाना पैकी तब्बल ५८ मते घेत दणदणीत विजय मिळविला तर त्यांचे प्रतिस्पर्धी तुषार जाधव यांना फक्त २० मते मिळाली.तर एक मत बाद झाले.आमदार राजू नवघरे यांनी या अगोदरच वसमत कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच जवळाबाजार कृषी उत्पन्न बाजार समिती राष्ट्रवादी अजित पवार गटच्या ताब्यात ठेवली असुन आता सलग दुसऱ्यांदा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून त्यांनी आपली सहकार क्षेत्रावर पक्कड मजबूत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.त्यांच्या या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह चे वातावरण निर्माण झाले आहेत.

Share
Back to top button