google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
ताज्या घडामोडी

हज 2027 यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी मोफत फार्म भरण्यास सुरुवात ▶️ खिदमत ए हुजाज कमिटी वसमतचे स्तुत्य उपक्रम

संपादक:- इसाक पठाण

वसमत:-

मुस्लिम धर्मियांचे पवित्र हज 2027 साठी जाणाऱ्या भाविकांसाठी येथील खिदमत ए हुजाज कमिटीच्या वतीने मोफत फार्म भरून देण्याचे स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे

प्रत्येक वर्षी वसमत येथून अनेक मुस्लिम बांधव पवित्र हजला जात आहे.हजला जाणाऱ्या भाविकांना तेथे गेल्यावर कोणतीही गैरसोय होऊ नये. पवित्र हज हा धार्मिक विधी,नियम व परंपरेनुसार योग्यरित्या व्हावे यासाठी खिदमत ए हुजाज कमिटी वसमतच्या वतीने प्रत्येक वर्षी मार्गदर्शन केले जाते.

केंद्र सरकारने हज 2027 साठी भाविकांकडून अर्ज भरून घेण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे.या निमित्ताने वसमत हुजाज कमिटीच्या वतीने वसमत शहर व तालुक्यातून हजला जाणाऱ्या भाविकांसाठी मोफत अर्ज भरून देण्यासाठी रविवार दिनांक 28 जून रोजी शहरातील जुम्मा पेठ शादीखाना मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

या कार्यक्रमाची सुरुवात मौलाना इम्तियाज बरकाती यांच्या कुराण पठणाने झाली

यावेळी इबादुर रहेमान उर्फ मोहम्मद शाहेद यांनी हज 27 ला जाणाऱ्या भाविकांसाठी केंद्र सरकारने आखलेल्या योजनाची माहिती दिली.तसेच खिदमते हुजाज कमिटी वसमतच्या वतीने हजला जाणाऱ्या भाविकांसाठी मोफत फार्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याचे सांगितले. तसेच मौलाना इम्तियाज बरकाती यांनी हज चे धार्मिक महत्त्व यावर प्रकाश टाकला.यावेळी मौलाना बासीत खासमी यांच्या दुआ नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

यावेळी मौलाना वाहेद,हाजी खैसर अहमद,हाजी अनवर फारुखी,हाजी नईम कुरैशी, अफरोज कादरी, पत्रकार इसाक पठाण, पत्रकार शरीफ आलम, पत्रकार मोईन कादरी,मुजफरोद्दीन, सईद भाई, मसलोद्दीन,यांच्यासह मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव उपस्थित होते.

Share
Back to top button