सिद्धेश्वर उपसा जलसिंचन योजनेला मान्यता.
आमदार राजुभैया नवघरे यांच्या प्रयत्नाला अखेर मोठे यश.
शरीफ आलम
वसमत विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सिद्धेश्वर उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी अनेक वर्षांपासून आमदार राजुभैया नवघरे प्रयत्न करत होते. दिवंगत स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांच्या माध्यमातून अनेक बैठका मंत्रालयात पार पडल्या होत्या. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कडे पण अनेक बैठका झाल्या..हिंगोली जिल्हा हा राज्यपाल सिंचन अनुशेषात मोडतो. हा अनुशेष दूर करण्यासाठी व वसमत विधानसभा मतदारसंघातील सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी आमदार राजुभैया नवघरे यांनी सतत पाठपुरावा करत होते..आता या सिद्धेश्वर उपसा जलसिंचन योजनेला मंजुरी मिळाली असुन त्यामाध्यमातुन सर्वेक्षण,अन्वेषण,ला पण मंजुरी देण्यात आली असून त्या माध्यमातून वसमत विधानसभा मतदारसंघातील पांगरा शिंदे सर्कल,अंबा सर्कल,शिरडशहापूर सर्कल,पुरजल सर्कल,पुर्ण या सर्कल मधील गांवे सिंचनाखाली येणार असून 3000ते 4000 हेक्टर सिंचन क्षेत्र आता पाण्याखाली येणार आहे.याला मान्यता स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्यामुळेच मिळाली पण दादा आज हे पहायला नाहीत यांची खुप मोठी खंत आहे या अगोदर पण अजित दादांनी पुर्णा नदीवरील पोटा,पिंपळगाव कुटे ,परळी दथरथे या मोठ्या बंधार्यांना मराठवाड्याच्या संभाजीनगर येथील कॅबिनेट मध्ये मंजुरी दिली त्याचे काम प्रगतीपथावर आहेत.वसमत तालुक्यातील 25 च्या वर आणि औंढा तालुक्यातील 15 गावांमधील मोठे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.या महत्त्वाच्या प्रकल्पांमुळे मतदारसंघातील सिंचन क्षमतेत मोठी वाढ होणार असून, शेतकऱ्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडेल.शेवटी आमदार राजुभैया नवघरे यांच्या प्रयत्नाने ही योजनेला मान्यता मिळाली असुन लवकरच कामाला सुरुवात होणार आहे..

