महात्मा बसवेश्वर महाराज जयंती निमित्त बैठक संपन्न
वसमत (इसाक पठाण)
वसमत शहरात महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी उत्सव समिती व समाज बांधवांची नियोजन बैठक घेण्यात आली.
नियोजन बैठकीचे आयोजन:-
दिनांक 19एप्रिल 2026 रोजी वसमत शहरात महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी केली जाणार आहे हा जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यासाठी सर्व पदाधिकारी व समाज बांधवांची अंतिम नियोजनाची बैठक गवळी मारुती मंदिर येथे संपन्न झाली. या बैठकीसाठी जयंती समितीचे सर्व पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते या बैठकीमध्ये महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त येण्यात येणारे विविध कार्यक्रमाचे नियोजन करून याप्रसंगी भव्य मिरवणूक व धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवर्याची प्रमुख उपस्थिती:-
वसमत येथील गुरुवर्य श्री करबसव शिवाचार्य महाराज, गुरुवर्य श्री वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज, गुरुवर्य श्री गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज गिरगाव यांची प्रमुख उपस्थिती व आशीर्वाचन लाभणार आहे. तसेच महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रा डॉ धाराशिव शिराळे यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे व सकाळच्या सत्रात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. असे नियोजन आज झालेल्या बैठकीमध्ये सर्वांच्या संमतीने ठरवण्यात आले आहे.
भव्य मिरवणूक:-
दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 4.00 वाजता होणाऱ्या जयंती उत्सवाचा मार्ग खालील प्रमाणे ठेवण्यात आला आहे .गवळी मारुती मंदिर येथून मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. ही मिरवणूक पोलीस स्टेशन, कारंजा चौक, मामा चौक, झेंडा चौक, सत्याग्रह चौक, सत्यनारायण टॉकीज मार्गे पुढे जात श्री सिद्धेश्वर मंदिर, लासिन मठ येथे संपन्न होणार आहे.
धर्म सभा व व्याख्यानाचे आयोजन-
त्यानंतर सायंकाळी 6.00 वाजता श्री सिद्धेश्वर मंदिर येथे धर्मसभा व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांचे स्मरण करून त्यांच्या विचार व तत्त्वज्ञानावर प्रकाश टाकण्यात येणार आहे.
समिती अध्यक्ष गोविंद एजगे यांचे आवाहन:-
या सर्व कार्यक्रमांसाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष श्री गोविंद एजगे यांनी सर्व बसव प्रेमी व हिंदू बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची विनंती केली आहे. या बैठकीसाठी श्री अशोक स्वामी प्रा प्रशांत विभुते सुनील कबाडे महादेव स्वामी रंगनाथ स्वामी अर्जुन सैदाने श्री रमाकांत बल्लमखाणे मनमत पुणेकर ऋषिकेश कानबले मुंजा परसवाळे सदानंद पिंपरणकर मन्मथ बेले विजय मुटकुळे ॲड ऋषिकेश देशमुख सचिन कापूसकरी हनुमंत नाईकवाडे चिंतामण यशवंते मल्लिकार्जुन नरवाडे आळने आप्पा महादेव एकलारे प्रा इमडे सर शिवा पत्रकार किरण कापूसकरी अँड किरण कट्टेकर संजय कळणे इत्यादी समाज बांधव उपस्थित होते

