google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
ताज्या घडामोडी

ईद -ए-मिलादुन्नबी डीजे मूक्त वातावरणात साजरी करा ▶️▶️▶️▶️▶️▶️ डीजे लावल्यास होणार कडक कारवाई- पो.नि.सुधीर वाघ

संपादक -इसाक पठाण

वसमत:-

ईद -ए-मिलादुन्नबी डीजे मूक्त वातावरणात उत्साहात साजरी करा परंतु उत्साहाच्या वातावरणात कोणी विघ्न लावून डीजे लावण्याचा प्रयत्न केल्यास तो डीजे जप्त करून कडक कारवाई केली जाईल असा  कडक इशारा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधीर वाघ यांनी दिला.

बुधवार दिनांक 12 आगस्ट रोजी ईद -ए-मिलादुन्नबी (स) च्या अनुषंगाने येथील शहर पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत ध्वनिप्रदूषण करणाऱ्या डी जे विषयी प्रामुख्याने चर्चा झाली.या संदर्भात शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधीर वाघ यांनी डी जे बंदी विषयी प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली व ईद -ए-मिलादुन्नबी डीजे मूक्त वातावरणात उत्साहात साजरी करण्याचे आवाहन केले जर एखाद्याने मिरवणुकीत डी जे लावले तर तो डीजे जप्त करून संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा ही त्यांनी दिला.यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी डी जे मुक्त ईद साजरी करण्यात येईल अशी ग्वाही दिली.

या बैठकीला ईद -ए-मिलादुन्नबी समितीचे अध्यक्ष महमद अतिक पापुलर, मौलाना इम्तियाज बरकाती, नगरसेवक शेख हबीब शेख बशीर,माजी उपनगराध्यक्ष खैसर अहमद,शेख अहमद अमीन साहब, सिद्दीक,नईम कुरैशी,अफसर लड्डा,आवेस अन्सारी, आदी उपस्थित होते.

Share
Back to top button