google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
ताज्या घडामोडी

कापीमुक्त दहावीच्या परिक्षेत जिल्हा परिषद उर्दु प्रशालेची उत्तुंग भरारी

वसमत (इसाक पठाण)

दहावीच्या कापी मुक्त परिक्षेत येथील जिल्हा परिषद उर्दु प्रशालेने उत्तुंग भरारी घेत उत्कृष्ट निकालाची परंपरा अबाधित ठेवल्याने पालकात समाधान व्यक्त केले जात आहे

जिल्हा परिषद उर्दू प्रशाला, वसमतने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या दहावीच्या बोर्ड परीक्षेत **६८.४०%** निकाल लावून घवघवीत यश संपादन केले आहे. या यशाबद्दल शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाची लाट असून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

शाळेत एकूण ३९ विद्यार्थी नोंदणीकृत होते, त्यापैकी ३८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यामध्ये २६ विद्यार्थी यशस्वी झाले असून एक विद्यार्थी ए.टी.के.टी. (ATKT) द्वारे उत्तीर्ण झाला आहे.

*गुणवंत विद्यार्थी**

यावर्षीच्या परीक्षेत सना अंजुम जमील शेख ही विघाल्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन नावलौकिक केले आहे,

शिफा माहिरीन अब्दुल कय्युम हिने द्वितीय क्रमांक पटकावला आहे

तर आयेशा तय्यब शेख तृतीय क्रमांकावर राहिली.

*यशस्वी विद्यार्थी **

प्रशालेतील इतर यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये आयशा फारूक शेख, अबू तालिब मोहम्मद अब्दुल हक, आफिया शौकत शेख, अफशा अंजुम सय्यद मोईन, अयान मौला शेख, बी.बी. हाजरा मोहम्मद एजाज, आयशा शेख रफिक, जरीन नाज मोहम्मद नाहेद कुरेशी, मोहम्मद अफनान कुरेशी मोहम्मद आमीर कुरेशी, मोहम्मद अराफत सिद्दीकी मुदस्सिर सिद्दीकी, मोहम्मद मुस्तकीम अब्दुल करीम, मोहम्मद मुजम्मिल मोहम्मद रहीम, मोहम्मद सबूर मोहम्मद इलियास, निदा इब्राहिम शेख, सानिया मखदूम शेख, सय्यद जीशान सय्यद जहीर, पठाण अफशान अहमद खान, जोया फातिमा अब्दुल सत्तार, तहेसीन फातिमा शेख साजिद, अंजुम आलिया शेख राज मोहम्मद शेख, शेख बुशरा जावेद, शेख अबुजर रफिक आणि शेख तय्यब खलील यांचा समावेश आहे.

शिक्षकांचे योगदान:-

या यशाबद्दल प्रशालेचे शिक्षक अन्वर खान सर, सय्यद अब्दुल्ला साबेर सर, अतीया हिना बाजी,अस्मा बाजी, राशेदा बाजी, उत्तमराव खरात सर , मोहम्मद शब्बीर सर आणि जमील सरवरी सर यांचे मोठे योगदान आहे “विद्यार्थ्यांची मेहनत पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे मार्गदर्शनच यशाचा खरा पाया आहे,”असे शिक्षकांनी यावेळी नमूद केले. अनवर खान सर यांनी समस्त गावकऱ्यांचा व सर्व सामाजिक, राजकिय तसेच शाळेच्या प्रगतीसाठी नेहमी धडपड करणाऱ्या सर्व नागरिकांच्या अनमोल सहकार्य बद्दल आभार मानले यशाची ही अनमोल भेट आपल्या सहकार्य मुळेच आम्हाला प्राप्त झाली आहे व जि.प. प्रशाला उर्दू वसमत चा प्रगतीचा प्रवास असाच पुढेच पुढे जाईल यासाठी आम्ही सर्व शिक्षक नेहमी प्रयत्न करत राहीन असा विश्वास अनवर खान सर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षिकेने व्यक्त केला.

प्रशालेची उत्तुंग भरारी पाहता शहरातील उर्दू भाषीक पालकांनी आपल्या पाल्यांना शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये जिल्हा परिषद उर्दु प्रशाला वसमत या शाळेत प्रवेश घ्यावा असे आवाहन अनवर खान सर यांनी केले आहे

Share
Back to top button