google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
ताज्या घडामोडी

परभणी -हिगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून महायुतीचे सईद खान विजयी

संपादक:- इसाक पठाण

वसमत ::-

परभणी – हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ निवडणुकीत महायुतीचे सईद खान 83 मताधिक्याने निवडून आले असून त्यांना 242 मते मिळाली त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ विवेक नावंदर यांचा पराभव केला . डॉ नावंदर यांना 159 मते मिळाली.

परभणी -हिगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात 465 मतदारापैकी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 131 भाजपाचे 99 तर शिवसेना शिंदे गटाचे 77 असे महायुतीचे एकूण 307 मतदार ह़ोते त्यामुळे ही निवडणूक महायुती साठी एकतर्फी वाटत होती.परंतू महाविकास आघाडीने शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे डॉ विवेक नावंदर यांना मैदानात उतरवले तसेच अपक्ष सुशिलकुमार सुरेश देशमुख यांनी अचानक मैदानात उडी घेऊन निवडणूक तिरंगी बनवली.

महायुतीत ही जागा शिवसेना शिंदे गटाला देण्यात आली होती.शिवसेना शिंदे गटात अनेकजण इच्छुक असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे चिरंजीव खासदार डॉ . श्रीकांत शिंदे यांनी त्यांचे विश्र्वासू व कट्टर समर्थक शिवसेना अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष सईद खान उर्फ गब्बर यांना उमेदवारी दिली व खान यांना विजयी करण्यासाठी पक्षाची संपूर्ण ताकद लावली.या निमित्ताने अल्पसंख्याक समाजाला न्याय देण्याचे व त्यांना पक्षाच्या जवळ करण्याचे प्रयत्न केले खासदार श्रीकांत शिंदे,राज्याचे उघोग मंत्री उदय सामंत व मंत्री संजय शिरसाठ तसेच संपर्क प्रमुख आनंद जाधव यांनी स्वतः लक्ष घालून विजयाचे व्यवस्थित नियोजन केले. परभणीच्या पालक मंत्री मेघना बोर्डीकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, खासदार बंडू जाधव, माजी आमदार सुरेश वरपूडकर ,आमदार विटेकर, आमदार रत्नाकर गुठ्ठे,वसमतचे आमदार राजू भैय्या नवघरे, कळमनुरीचे आमदार संतोष बांगर, हिंगोली चे आमदार तानाजी मुटकुळे हया परभणी व हिंगोली जिल्ह्यातील महायुतीच्या खासदार आमदारांनी फिल्डींग लावून महायुतीच्या मतदारांची मते सईद खान यांच्या पारड्यात टाकण्यात यशस्वी परीश्रम घेतलं.

सोमवार दिनांक 22 जून रोजी परभणी येथे मतमोजणी झाली 465 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला पहिल्या पसंतीची निवडून येण्यासाठी 229 मताची आवश्यकता होती झालेल्या 465 मतापैकी महायुतीचे सईद खान यांना पहिल्याच पसंतीचे 242 मते मिळाली तर महविकास आघाडीचे डॉ विवेक नावंदर यांना पहिल्या पसंतीची 159 तर अपक्ष सुशिलकुमार सुरेश देशमुख यांना पहिल्या पसंतीची 56 मते मिळाली 8 मत अवैध ठरले . पहिल्या पसंतीच्या मतावरच महायुतीचे सईद खान हे निवडून आल्याने दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीची गरज पडली नाही.अशा तर्हेने सईद खान हे 83 मतांनी विजयी झाले. महायुतीची 80 पेक्षा जास्त मते फुटली हे विशेष.

विजया नंतर परभणी -हिगोली जिल्ह्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

वसमत, कळमनुरी व हिंगोली येथील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगरसेवकांना एकत्र करून सईद खान यांना मतदान करुन घेण्यात वसमतचे आमदार राजू भैय्या नवघरे यांनी सिंहाचा वाटा उचलला आहे.त्यामुळे विजयी उमेदवार सईद खान यांनी आमदार राजू भैय्या नवघरे यांचे विशेष आभार मानले.

Share
Back to top button