शाळेच्या पहिल्याच दिवशी विघार्थ्याचे जल्लोषात स्वागत फुलसिंग नाईक उर्दु प्राथमिक शाळेत विद्यार्थी प्रवेश सोहळा उत्साहात साजरा

वसमत (इसाक पठाण)
शाळेच्या पहिल्याच दिवशी शहरातील फुलसिंग नाईक उर्दु प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन जल्लोषात स्वागत करण्यात आले.
फुलसिंग नाईक उर्दु प्राथमिक शाळा ही वसमत शहरात उर्दु माध्यमाची नवाजलेली शहरातील पहिली व सर्वात जुनी शाळा आहे.या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे अनुभवी , होतकरू व प्रत्येक विषयात तज्ञ शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करतात. शाळेच्या या वैशिष्ट्या बरोबरच नवीन सुसज्ज व भव्य इमारतीने शैक्षणिक वातावरणांत अधिकच भर घातली आहे
अशातच नवीन शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी सोमवार 15 जून रोजी शाळा सुरू झाली आहे.शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळा प्रवेशा निमित्त नवीन विद्यार्थ्यांच्या प्रवेशा सोबतच जुन्या विघार्थ्याचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले यावेळी शाळेचे अध्यक्ष अमजद खान उर्फ नम्मू, मुख्याध्यापक कैलास राठोड,शिक्षक व शिक्षिका विघार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

