google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
ताज्या घडामोडी

महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त प्रभाग ८ मध्ये स्वच्छता व वृक्षारोपण अभियान

वसमत

शरीफ आलम

महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्या जयंतीनिमित्त आमदार राजू नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली वसमत शहरात जनसेवा सप्ताह विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. त्याअंतर्गत गुरुवार, २३ जुलै रोजी प्रभाग क्रमांक ८ मधील नालंदा नगर येथे स्वच्छ भारत अभियान व वृक्षारोपण मोहीम उत्साहात राबविण्यात आली.स्वच्छ, सुंदर आणि हरित भारताच्या संकल्पनेला बळ देण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमात परिसर स्वच्छता, कचरा निर्मूलन तसेच पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण करण्यात आले. नागरिकांनीही या अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.यावेळी आमदार राजू नवघरे, नगरसेवक शेख मोहम्मद कामरान, नगरसेविका स्नेहा मनोहरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.तसेच उपनगराध्यक्ष सय्यद इमरान नासेर अली, लक्ष्मीकांत नवघरे,राजूभैय्या सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळूमामा ढोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे वसमत शहराध्यक्ष आनंद बडवणे, नगरसेवक प्रतिनिधी शेख युनूस (पॉप्युलर), हारून दालवाले, मुबीन जमीनदार यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share
Back to top button