google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
ताज्या घडामोडी

बी डी एस परिक्षेत डॉ.निधी महेंद्र कापूसकरी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण

वसमत(इसाक पठाण)

वसमत येथील वाणी समाजाचे प्रतिष्ठित व्यापारी कैलासवासी महेंद्र उर्फ बबन आप्पा विश्वनाथ आप्पा कापुसकरी यांची सुकन्या डॉक्टर निधी महेंद्र कापूसकरी हिने वैद्यकीय क्षेत्रातील बीडीएस ही पदवी विशेष प्राविण्यसह मिळवली .तिने मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल तिचा ॲड चंद्रकांत देवणे मित्र मंडळाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.

समाजातील होतकरू यशस्वी विद्यार्थी, विविध क्षेत्रात नाव कमावलेले समाज बांधव, समाजाभिमुख कार्य करणाऱ्या समाजातील समाजसेवकांचा व पदाधिकाऱ्यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्याची भूमिका ॲड चंद्रकांत देवणे मित्र मंडळाने हाती घेतली आहे या उपक्रमा अंतर्गत बुधवारी दिनांक 6 एप्रिल रोजी डॉक्टर निधी महेंद्र कापूसकरी हिचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता

डॉक्टर निधी हिने वसमत येथील वाणी समाजातील पहिली बीडीएस डॉक्टर होण्याचा मान मिळवला आहे विशेष प्राविण्यसह तिने ही पदवी प्राप्त केली आहे विशेष म्हणजे तिची परीक्षा सुरू असताना तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता तिचे वडील महेंद्र कापूसकरी यांचे अकस्मात निधन झाले होते एवढ्या कठीण प्रसंगातून तिने मिळवलेले यश विशेष उल्लेखनीय आहे त्यामुळे तिचे कौतुक करण्यासाठी मित्र मंडळाच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सत्कार सोहळ्यासाठी ॲड चंद्रकांत देवणे मंडळाचे अध्यक्ष श्री गजानन कापूसकरी उपाध्यक्ष सत्यनारायण नखाते सचिव दिगंबर हुसे ज्येष्ठ सदस्य रमेशआप्पा पत्रे , महादेवआप्पा बेले,नारायणआप्पा महाजन ,लक्ष्मीकांत मुटकुळे वाणी समाजाचे अध्यक्ष मन्मथआप्पा बेले, राधाकृष्ण पत्रे, दिपक महाजन, सुरेन्द्रकुमार वरवंटे, अंतेश्वर नरवने,, आनंद ढोले, सौ. संजीवनी महादेव आप्पा कापूसकरी, पप्पू कापूसकरी यांच्यासह ॲड चंद्रकांत देवणे मित्र मंडळातील सदस्य पदाधिकारी समाज बांधव यांची उपस्थिती होती

डॉ निधी महेंद्र कापूसकरी ही कैलासवासी विश्वनाथ आप्पा कापूसकरी कापूसकरी यांची नात तसेच अड चंद्रकांत देवणे मित्र मंडळाचे अध्यक्ष गजानन आप्पा कापूसकरी यांची पुतणी आहे.

Share
Back to top button