जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विनोद अंभोरे यांची बिनविरोध निवड..
आ.राजू नवघरे यांचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध..
शरीफ आलम
औंढा तालुक्यातील जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी आमदार राजू भैया नवघरे यांचे खंदे समर्थक विनोद अंभोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून उपसभापतीपती शिंदे सेनेचे भगवानराव काचगुंडे यांची निवड करण्यात आली आहे.
माजी सभापती शिवाजी भालेराव यांच्याविरुद्ध 13 संचालकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडेअविश्वास ठराव दाखल केला होता .या अविश्वास ठरावावर २ मार्च रोजी उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या अध्यक्षतेखाली वसमत येथे तहसील कार्यालयात बैठक होऊन सदरील अविश्वास ठराव पारित झाल्यामुळे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या आदेशावरून वसमत चे सहाय्यक निबंधक यांच्या अध्यक्षतेखाली जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात शुक्रवार 20 मार्च रोजी नवीन सभापती उपसभापती निवड करण्यासाठी विशेष सभा बोलविण्यात आली होती. या सभेत माजी सभापती शिवाजीराव भालेराव व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे आठ शिंदे शिवसेनेचे सात भाजपचे दोन असे एकूण 17 संचालक उपस्थित होते.यावेळी सभापतीपदासाठी आमदार राजू नवघरे यांचे कट्टर समर्थक विनोद अंभोरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी बिनविरोध निवड करण्यात आली. यानंतर उपसभापतीसाठी शिंदे सेनेचे भगवानराव काचगुंडे यांचाही एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची उपसभापती पदी निवड जाहीर करण्यात आली.निवड जाहीर होताच सभापती व उपसभापती यांनी आमदार राजू भैय्या नवघरे यांचे आभार मानले. यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.आमदार राजू भैया नवघरे यांच्या विकास प्रिय नेतृत्वामुळे वसमत कृषी उत्पन्न बाजार समिती.वसमत नगर परिषद.तसेच आता जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीवर आमदार नवघरे यांनी आपली सत्ता प्रस्थापित करून आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.
