google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
ताज्या घडामोडी

वसमतच्या तहसीलदार पदाचा सारंग चव्हाण यांनी पदभार स्वीकारला

तहसीलदारांचेअधिकारी व कर्मचाऱ्यांकडून जंगी स्वागत

संपादक::- इसाक पठाण

वसमत:-

वसमतच्या तहसीलदार पदी सारंग चव्हाण यांनी नियुक्ती झाली असून उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या उपस्थितीत त्यांनी पदभार स्वीकारला आहे

वसमत चे तहसीलदार शारदा दळवी यांच्या नंतर उपविभागीय अधिकारी नन्नवरे यांची तहसीलदार पदी नियुक्ती करण्यात आली होती परंतु उपविभागीय अधिकारी पदाचा प्रशिक्षणार्थी काळ असल्याने दीड महिन्यातच त्यांची बदली झाली आहे

वसमत तहसील कार्यालयात असलेला कामांचा व्याप व एसआयआर, जनगणना सारख्या महत्त्वाच्या कामाच्या कार्यकाळात कर्तव्यदक्ष व दांडगा अनुभव असलेले अनुभवी तहसीलदार वसमतला मिळायला हवे अशी सर्वसामान्य नागरिकांची व शेतकऱ्यांची ईच्छा होती त्या प्रमाणे शासनाने हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, औंढा तहसील कार्यालयात तहसीलदार म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावणारे तसेच या परिसरातील जाण असलेले अनुभवी व कर्तव्यदक्ष तहसीलदार सारंग चव्हाण यांची वसमतच्या तहसीलदार पदी नियुक्ती केली आहे.वसमत तहसील कार्यालयात रुजू झाल्यानंतर त्यांनी उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या उपस्थितीत तहसीलदार पदाचा पदभार स्वीकारला आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच नायब तहसीलदार डोणगावकर,मंडळ अधिकारी,तलाठी, अव्वल कारकून सर्व महसूल विभागाच्या वतीने ही त्यांचा सत्कार करण्यात आला .

Share
Back to top button